Skip to main content

Posts

Featured

माझी मिसळयात्रा

माझी मिसळयात्रा  तसा मिसळीचा आणि माझा खूप घनिष्ट संबंध आहे , लहान असताना हॉटेल मधले खायला आवडायचे नाही तेंव्हा वडिलांनी दादरच्या एका हॉटेल मध्ये मिसळ खायला घातलेली, पहिल्यांदाच खाल्ली पण डोसा आणि इडली खाल्लेल्या जिभेला , झणझणीत मिसळ खूपच भावली. खरतर फरसाण आणि मुगाची उसळ असलेला एक पदार्थ खायचा याचीच जास्त गम्मत यायची मला, पण हि मिसळ तिच्या त्या पहिल्या भेटीतच मला आवडली किंवा पहिल्याच भेटीत तिच्या प्रेमात पडलो. पण मिसळ खायचा योग फक्त कधीतरीच जेंव्हा बाबांबरोबर दादरला जायचो आणि त्यांना मला हॉटेल मध्ये न्यावेसे वाटले तरच यायचा. आई तशी सुगरण होती आणि तिला या असल्या प्रकारांचे काहीच अप्रूप नव्हते , त्यामुळे घरी कधी मिसळ पार्टीचा योग नाही आला. या सगळ्या प्रकारांमुळे मिसळ म्हणजे माझ्यासाठी एखादा फक्त दिवाळीला खाणाऱ्या पदार्थासारखा एक दुर्मिळ प्रकार होता , याशिवाय सांताक्रूझ मधल्या तमाम अण्णा लोकांच्या हॉटेलच्या मेनूमध्ये असा कोणताही प्रकार नव्हता. काही वर्षांनी कॉलेज चालू झाले पण कॅन्टीन मध्येही असा काही पदार्थ मिळत नव्हता. कधीतरी कुठेतरी अभावानेच मला मिसळ खायला मिळत होती पण जसे कुणीच...

Latest posts

जागतिक महिला दिन

CST दुर्घटना आणि आपण